एमपीसी न्यूज – सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने आयटी हब असलेल्या हिंजवडीत 519.72 कोटी रुपयांची गुंतवणूक किती (Microsoft)आहे. त्यामुळे भविष्यात मायक्रोसॉफ्ट कडून हिंजवडी मध्ये मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत.
मायक्रोसॉफ्टची भारतीय शाखा, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यातील हिंजवडी येथे 66 हजार 414.5 चौरस मीटर (16.4 एकर) जमीन खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात ही खरेदी झाली असून या व्यवहारात इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी एलएलपी कडून जमीन खरेदी केली गेली आहे.
PCMC : 25 उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस
सन 2022 मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरात 25 एकर भूखंड खरेदी केला. मायक्रोसॉफ्टकडून पिंपरी चिंचवड शहरात डेटा सेंटर सुरू केले (Microsoft) जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. पिंपरी चिंचवड पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट ने हैदराबाद मध्ये देखील 48 एकर जमीन खरेदी केली. पिंपरी चिंचवड शहरासह मुंबई आणि चेन्नई येथे देखील कंपनीकडून डेटा सेंटर तयार केले जातील.
मायक्रोसॉफ्टच्या बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि पुणे या पाच शहरांमध्ये असलेल्या कार्यालयांमध्ये सुमारे 23 हजार कर्मचारी काम करत आहेत. मायक्रोसॉफ्टने सन 2024 च्या सुरुवातीला एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सन 2025 पर्यंत 20 लाख लोकांना एआय आणि डिजिटल कौशल्यांनी सुसज्ज केले जाणार आहे. ‘स्किल्स फॉर जॉब्स’ या उपक्रमांतर्गत कंपनीकडून कौशल्याधारित मनुष्यबळ विकसित केले जाणार (Microsoft) आहे.