Moshi : बनावट कागदपत्र व ठश्यांचा वापर करून आरटीओ तसेच बँकेची फसवणूक


एमपीसी न्यूज – कर्जाचे हप्ते थकल्यामुळे ब्लॅकलिस्ट (Moshi) मध्ये गेलेली गाडी काढण्यासाठी बनावट कागदपत्रे ठसे यांचा वापर करत आरटीओ ऑफिस व बँकेचे फसवणूक करण्यात आली आहे. ही सारी फसवणूक 15 डिसेंबर 2022 ते 10 मे 2023 या कालावधीत पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय मोशी येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी प्रीतम मोहन शिंदे (रा मामुर्डी देहूरोड) याच्याविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अमोल सदरे यांनी फिर्याद दिली आहे.

Alandi : आळंदीमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त मांडेकरांच्या लक्ष्याचा विशेष सत्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी जग्वार लँड रोवर कार (एम एच 14 जीएस 8300 ) या गाडीवर स्टेट बँकेचे 2018 मध्ये लोन काढले होते. गाडीचे हप्ते न भरल्यामुळे गाडी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याचे पत्र आरोपीला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी यांच्याकडून मिळाले. मात्र आरोपीने स्टेट बँकेची खोटी कागदपत्रे तयार करून खोटे शिक्के वापरून संबंधित गाडी ब्लॅक लिस्ट मधून कमी (Moshi) करून गाडीवर स्टेट बँकेचा बोजा कमी करण्यास लावला. अशा प्रकारे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व स्टेट बँक ऑफ इंडिया यांची फसवणूक केली आहे. फसवणूक उघडकीस येताच आरोपी विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.