Moshi : मिळकतीमध्‍ये घुसखोरी करणार्‍यावर गुन्‍हा दाखल


एमपीसी न्यूज – कुलूप तोडून मिळकतीमध्‍ये घुसखोरी करणार्‍या एकावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला ( Moshi ) आहे. ही घटना बोर्‍हाडेवाडी, मोशी येथे सोमवारी (दि. 2) सायंकाळी घडली.

 

राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 41, रा. घोरपडे पेठ, स्वारगेट, पुणे) यांनी गुरुवारी (दि. 5) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशव शिवराम रेड्डी (वय 45, रा. बो-हाडेवाडी, मोशी) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

Moshi : संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भागाला तडा की तुटला; चौकशी सुरू

 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, स नं 123, सीएनजी पंपाजवळ बो-हाडेवाडी मोशी पुणे या मिळकतीचा ताबा दिला होता. तरीदेखील आरोपी केशव यांनी मिळकतीला लावलेले दरवाज्याचे कुलूप व सील तोडुन नुकसान करीत मिळकतीमध्ये बेकायदेशीररित्‍या अतिक्रमण केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत ( Moshi ) आहेत.