Moshi : मोशी येथे इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली


 

एमपीसी न्यूज – मोशी येथील तापकीर वस्ती (Moshi) येथे इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाली. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी उघडकीस आली. 

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील तापकीर वस्ती येथे इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाल्याची माहिती सोमवारी सकाळी अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.

Pune Rain : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची धुंवाधार, लोणावळ्यात 115 तर वडगाव शेरी येथे 113 मिमी पावसाची नोंद

अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या सहाय्याने दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. अद्याप दोन्ही मुलांबाबत शोध लागला नाही. मुले नदीत कशासाठी गेली होती, याबाबत माहिती मिळू शकली नाही. नागरिकांनी नदीकाठी (Moshi) गर्दी केली आहे.