Moshi : नदीची पूजा करताना एकजण पाण्यात पडला; त्याला वाचवण्यासाठी गेलेले दोघे बुडाले

[ad_1]

एमपीसी न्यूज – मोशी परीसरातील एका आश्रमात शिकणारे विद्यार्थी इंद्रायणी नदीची पूजा (Moshi )करण्यासाठी घाटावर गेले. तिथे पूजा करत असताना एकजण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले तिघेजण पाण्यात बुडाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली. त्यातील एकाला वाचवण्यात आले असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तिसऱ्या मुलाचा मृतदेह सापडला नाही.

 

ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय 16, रा. पद्मावती गल्ली, लातूर), प्रणव रमाकांत पोतदार (वय 17, रा. खर्डा आष्टी, बीड) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. जय ओमप्रकाश दायमा (वय 19, रा. वनी, नाशिक) हा विद्यार्थी जखमी झाला आहे.

Chinchwad : सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा

 

याबाबत माहिती अशी की, मोशी परिसरात वैदिक विद्यालय येथे शिकणारे 71 विद्यार्थी श्रावणी उपाकर्म करीता सोमवारी सकाळी इंद्रायणी नदी मोशी येथे आले होते. त्यातील एकजण पूजा करताना इंद्रायणी नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी ओमकार, प्रणव आणि त्यांचे तीन मित्र गेले. मात्र पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवताना ओमकार आणि प्रणव हे पाण्यात बुडाले. इतर दोघेजण वाचले. तर तिसरा मित्र जखमी झाला आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

 

दुपारी दोन वाजताच्या सुमारास बुडालेल्या दोघांपैकी ओमकार याच मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. प्रणव पोतदार (Moshi ) याचा मृतदेह सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.

[ad_2]