Moshi: पत्नीची दुचाकी  बनावट कागदपत्रे करून स्वतःच्या नावावर करून घेतल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल


एमपीसी न्यूज –  पत्नीच्या नावावर असलेली दुचाकी परस्पर स्वतःच्या मनावर करून घेतल्या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना मोशी येथे 10 ऑक्‍टोबर 2020 ते 16 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी येथे घडली.

सुरेखा दत्ता दौंड (वय 40, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 26) भाेसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्‍ता रंगनाथ दौंड (वय 35, रा. केज, सोलापूर) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

Pimpri – ‘गीता आश्रम’,पुणे: येथे जन्माष्टमी भक्तिभावाने साजरी

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा यांनी खरेदी केलेली 20 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची स्पेल्डर प्लस मोटार सायकल (एमएच 14 डीवाय 4134) ही फिर्यादी सुरेखा यांचे पती आरोपी दत्‍ता दौंड यांनी 2021 मध्ये जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ ऑफिस) येथे फिर्यादी यांची खोटी सही करुन व खोटी, बनावट कागदपत्रे दाखल करुन दुचाकी स्वताःच्‍या नावावर ट्रान्सफर करुन फिर्यादी सुरेखा यांची फसवणूक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.