[ad_1]
एमपीसी न्यूज – गायकवाड वस्ती, मोशी येथे सुरू असलेल्या दारूभट्टीवर (Moshi)पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा मारला. यामध्ये तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 5) करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थ्री अॅसीस स्ट्रक्चर अॅण्ड प्रा लि या कंपनीचे जवळ, खाणीचा रोड, गायकवाड वस्ती, मोशी येथे अर्जुन लिंबा कंजारभट याने गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन रापत ठेवले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली.
Ganeshotsav 2024: मराठी कलाकारांच्या घरी उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन;चाहत्यांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
त्यानुसार पोलिसांनी छापा मारुन गावठी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, प्लास्टिक बॅरल व प्लास्टिकच्या मोठया टाक्या असे 6 हजार 700 लिटरचे रसायन व साहित्य असा एकूण तीन लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करून अर्जुन लिंबा कंजाभट याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पोलीस विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, तसेच अमंलदार मुल्ला, महाडीक, मोरे, कमले, गर्जे यांनी केली आहे.
[ad_2]