एमपीसी न्यूज – निगडीतील यमुनानगर (Nigdi) येथील मॉडर्न हायस्कुलमधील स्काऊट गाईड पथकाच्या मुलींनी यमुनानगर येथील अपंग विद्यालयातील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी मॉडर्न हायस्कुलच्या स्काऊट गाईडच्या मुलींनी अपंग मुलांना औक्षण करून त्यांना राखी बांधून पेन आणि खाऊ दिला.
Chinchwad : सात दुकानदारांकडून बजाज फायनान्स कंपनीची फसवणूक
या दिव्यांग मुलांना रक्षाबंधनाचा आनंद घेता यावा यासाठी (Nigdi) अनेक वर्षांपासून स्काऊट गाईडचे विद्यार्थी हा उपक्रम करत असल्याचे मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी सांगितले. यावेळी स्काऊट गाईड प्रमुख सुजाता ठोंबरे, शिवाजी अंबिके उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, राजीव कुटे, विजय पाचारणे यांनी केले.
youtube.com/watch?v=sP-5Il_jHbI&t=321s
The post Nigdi : निगडीतील अपंग विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे first appeared on MPC NEWS.