एमपीसी न्यूज – गणेश उत्सवा ‘ निमित्त प्राधिकरण विचार मंच, श्री चिंतामणी मंदिर ट्रस्ट, व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ निगडी, यांच्यावतीने सामुदायिक ( Nigdi ) अथर्वशीर्ष पाठणाचे रविवारी (दि.8) सकाळी आठ वाजता आयोजन केले होते.
निगडी येथील श्री. चिंतामणी गणेश मंदिर येथे हा अथर्वशीर्ष पाठणाचा कार्यक्रम पार पडला.भक्ती भाटे यांनी सर्वांच्या समोर बसून अथर्वशीर्ष पठण सुरुवात केली. त्यांच्याबरोबर उपस्थित सर्वांनी अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी अथर्वशीर्ष पठणाची 21 आवर्तने घेण्यात आली. अथर्वशीर्ष पठणानंतर फलश्रुती घेण्यात आली व गणपतीची सामुदायिक आरती करण्यात आली.
Pune : गणपती बाप्पाच्या देखाव्यातून साकारली 100 वर्षापूर्वीची वाडा संस्कृती
अथर्वशीर्ष पठण सामुदायिक कार्यक्रमाचे यंदा अकरावे वर्ष असून कार्यक्रमास, निगडी प्राधिकरण व परिसरातील महिला, पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला तसेच परिसरातील सर्व गणेशभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती भगवान महाजन, अध्यक्ष प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, महेश ढाकणे, सचिव चिंतामणी मंदिर ट्रस्ट,सुभाष जोशी अध्यक्ष, जगन्नाथ वैद्य अध्यक्ष संत ज्ञानेश्वर उद्यान, बाळासाहेब साळुंखे, अध्यक्ष संत तुकाराम उद्यान, अलका बेल्हेकर अध्यक्ष गजानन उद्यान स्मिता देशपांडे,अध्यक्ष स्वानंद संघ,सुलोचना करपे,अध्यक्ष दादा दादी उद्यान कुंदा एरवंडे अध्यक्ष माऊली उद्यान, शामसुंदर परदेशी, अध्यक्ष, चांदबी सय्यद आदी उपस्थित होते.
सर्व उपस्थितांचा मनसे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष बाळा दानवले यांनी सत्कार केला.
उपस्थितांचे स्वागत स्वाती बाळा दानवले अध्यक्ष महिला प्राधिकरण विचार मंच यांनी केले, व आभार भागवत नागपुरे यांनी केले . कार्यक्रमाचे नियोजन बाळा दानवले, उपाध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर, स्वाती बाळा दानवले, अध्यक्ष महिला प्राधिकरण विचार मंच, भागवत नागपुरे, गणेश उज्जैनकर, किशोर दानवले, गणेश काळभोर, यांनी केले ( Nigdi ) होते.