[ad_1]
एमपीसी न्यूज – मागील अनेक दिवसापासून फरार असलेल्या (Nigdi )आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.5) निगडी येथील ओटा स्कीम येथे करण्यात आली आहे.
कृष्णासिंग भारतसिंग बावरी (वय 39 रा. निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगणे सह इतर गंभीर गुन्हे दाखल होते. मात्र आरोपी हा अनेक दिवसापासून पसार होता. खंडणी विरोधी पथकाला आरोपी ओटा स्कीम परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने कारवाई करत त्याला अटक केली. पुढील तपासासाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे 02 बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, अमंलदार चौधरी, मावसकर यांनी केली आहे.
[ad_2]