[ad_1]
एमपीसी न्यूज – निगडीतील लि. सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे (Nigdi)कीर्ती विद्यालय महापालिकेच्या इमारतीत सुरू असून विद्यालय प्रशासनाने पालिकेचे बारा लाख रूपयांचे भाडे थकविले आहे. त्यामुळे पालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाकडून विद्यालय प्रशासनाला थकीत रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. तसेच तीन दिवसात पैसे न भरल्यास विद्यालयाच्या खोल्या ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी दिला आहे.
निगडी, प्राधिकरण येथे लि. सोफिया एज्युकेशन सोसायटी ट्रस्टचे कीर्ती विद्यालय आहे. या विद्यालयातील निवृत्ती देवराम काळभोर या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निगडी, प्राधिकरण येथे तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावरील सहा खोल्या विद्यालयासाठी भाडेत्तवावर दिल्या आहेत. विद्यालयाचा गेल्या 18 वर्षांपासून करारनामाच करण्यात आला नसल्याची बाब उघडकीस आली होती. तसेच विद्यालय प्रशासनाकडे सुमारे तीन वर्षांचे 11 लाख 85 हजार 125 रूपये भाडे थकीत असल्याचेही समोर आले होते.
Pune : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाकडून मोहीम; मनमानी प्रवास भाडे आकारणीबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन
विनयभंगाच्या प्रकारानंतर महापालिकेचा भुमि आणि जिंदगी विभाग खडबडून जागा झाला. विभागाने या विद्यालय प्रशासनाकडे थकीत असलेल्या रक्कमेसाठी अ क्षेत्रीय अधिका-यांना नोटीस देण्यास सांगितले होते. त्यानुसार क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी विद्यालय प्रशासनाला 11 लाख 85 हजार 125 रूपयांची नोटीस बजाविली आहे. हे पैसे तीन दिवसात भरण्याचे आदेशही दिले आहेत. तीन दिवसात पैसे न भरल्यास विद्यालयाच्या खोल्या ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा पानसरे यांनी दिला आहे.
[ad_2]