Nigdi : निगडीतील ‘त्या’ शाळेला भाडेतत्त्वावर दिलेली इमारत पुन्हा ताब्यात घ्या – अमित गावडे


एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणामध्ये (Nigdi) महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीमधील किर्ती विद्यालयातील शिक्षकाने 13 वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महापालिकेने भाडेतत्वार दिलेली इमारत ताब्यात घ्यावी अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक अमित गावडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात माजी नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, महापालिकेकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीमध्ये किर्ती विद्यालयाची दहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेतील मुलीशी सहा वर्षांपूर्वी अश्लील चाळे केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा झालेल्या आणि जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या क्रीडा शिक्षकाने त्याच शाळेतील 13 वर्षांच्या मुलीशी पुन्हा अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह सात जणांना अटक केली आहे.

Pune : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार विदुषी देवकी पंडित यांना जाहीर

शाळा व्यस्थापनाने न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या शिक्षकाला पुन्हा शाळेत रुजू करून घेणे अतिशय गंभीर आहे. मुलीने तक्रार केल्यानंतरही शाळा व्यस्थापनाने गुन्हा दाखल करण्याबाबत दोन दिवस कोणतीही भूमिका घेतली नाही. शिक्षकाला वाचविण्याचे प्रयत्न केला जात होते असे दिसते. संबंधित शिक्षक अनेक दिवसांपासून मुलीला त्रास देत होता असे पोलिसांकडून सांगितले जात आहे. पोलिसांच्या (Nigdi) दामिनी पथकामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या इमारतीत सुरू असलेल्या शाळेत असा प्रकार झाल्याने प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत. ही शाळा अतिशय लोकवस्तीत आहे. शाळा सुटल्यानंतर मुले गल्लीबोळात गैरवर्तन करताना दिसतात. आरडाओरडा सुरू असतो. मुलींची छेड काढली जाते. त्यामुळे अशी गैरकृत्य होणाऱ्या शाळेला इमारत भाडेतत्त्वावर देणे चुकीचे आहे. त्यामुळे महापालिकेने ही इमारत पुन्हा ताब्यात घ्यावी. भाडेकरार मोडवा आणि याबाबत तत्काळ पाऊले उचलावीत, असे निवेदनात म्हटले आहे.