Paris : आजपासून पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात , गुगलने डूडलद्वारे दिल्या शुभेच्छा


एमपीसी न्यूज – पॅरालिम्पिक खेळांचा उद्घाटन सोहळा (Paris) पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर आज (28 ऑगस्ट) होणार आहे. पॅरिसमध्ये उद्घाटन सोहळा 8 वाजता सुरू होणार असला तरी भारतीय वेळेनुसार तो रात्री 11.30 वाजता सुरू होईल.

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा खेळाडूंचा मेळावा होणार आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा अॅथलीट येथे पोहचले आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा आजपासून (28 ऑगस्ट) ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. या स्पर्धेतील 22 खेळांमध्ये 4400 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 549 पदके असतील, त्यापैकी 236 पदके महिलांसाठी असतील.

या स्पर्धेत 32 महिला खेळाडूंसह 84 खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व (Paris) करणार आहेत. यापैकी सुमारे 50 खेळाडू हे पदक जिंकण्यासाठी सक्षम आहेत. यातून प्रमोद भगतचा उत्तेजकद्रव्य नियमांचे उल्लंघन केल्याने भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही.

PCMC : ‘यार क्या कर रहो हो’…

महाराष्ट्राचे खेळाडू

सचिन खिलारी, भाग्यश्री जाधव (गोळाफेक), संदीप सरगर (भालाफेक), दिलीप गावित (400 मीटर धावणे), सुकांत कदम (बॅडमिंटन, पुरुष एकेरी), ज्योती गडेरीया (पॅरा सायकलिंग), स्वरूप उन्हाळकर (नेमबाजी, 10 मीटर एयर रायफल), सुयश जाधव (जलतरण, 50 मीटर बटरफ्लाय) हे खेळाडू महाराष्ट्राचे खेळाडू स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणार आहेत.