एमपीसी न्यूज – पवना धरण सद्यस्थितीत 100% भरलेले असून (Pawana Dam) धरणाच्या सांडव्यावरून 2220 क्युसेक्सने विसर्ग नदीपात्रामध्ये सुरु आहे. रात्री 9 वाजल्यानंतर त्यात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पाणलोट क्षेत्रामधील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता रात्री 9 वाजल्यापासून सांडव्याद्वारे विसर्ग वाढवून 4320 क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग करण्यात येणार आहे. सांडव्यावरील विसर्ग वाढवल्यानंतर नदीपात्रामध्ये एकूण 4320 क्यूसेक्स इतका विसर्ग नदीपात्रामध्ये होणार आहे.
Pune : पुणे ग्रामीणचे नवे अधीक्षक संदीप सिंह गिल तर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून (Pawana Dam) नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo