PCMC : ‘यार क्या कर रहो हो’…


एमपीसी न्यूज – ‘यार क्या कर रहो हो, मेरे से ज्यादा आपको (PCMC) मॅसेज आते है क्या’, बच्चो जैसी हरकते करते हो’ असे सुनावत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे बैठकीत मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर संतापले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मंगळवारी (दि.27) स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा झाली.  या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्थायी समितीच्या बैठकीनंतर ‘क्लेमेंट बजेट’ संदर्भात खासगी एजन्सीच्या प्रतिनिधीमार्फत सादरीकरण सुरू होते. हे सादरीकरण पाहण्यात रस नसलेले अधिकारी मोबाईल बघण्यात व्यस्त होते. (PCMC) त्यामुळे आयुक्त सिंह यांनी ‘यार क्या कर रहो हो, मेरे से ज्यादा आपको मॅसेज आते है क्या’, बच्चो जैसी हरकते करते हो’ असे सुनावले.

Today’s Horoscope 28 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आयुक्त सिंह यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, आयुक्तच बैठकीसाठी अर्धा तास उशिरा आले. त्यानंतर सुरुवातीला स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभा झाली. ‘क्लेमेंट बजेट’ संदर्भात सादरीकरण झाले. सारथी हेल्पलाईन, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा आढावा, शिक्षण विभागाच्या डीबीटी अशा सायंकाळी सात वाजेपर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू होता.