एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (PCMC) सीताराम बहुरे यांची उपायुक्तपदी बढती झाली आहे.
महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून सीताराम बहुरे यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याच्या निर्णयास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
Pune : साई, स्टील प्लांट्स स्पोर्ट्स बोर्ड उपांत्यपूर्व फेरीत
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत (PCMC) असणारे सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी पदोन्नती झाली असून ते सध्या फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.