[ad_1]
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक वसीम कुरेशी यांचे (PCMC) प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांचे वय 52 होते.
वसीम कुरेशी यांनी कर संकलन, जनसंपर्क विभागात काम केले. मनमिळाऊ अधिकारी अशी त्यांची ओळख होती. महिन्याभरापूर्वी श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतर शुगर वाढली. प्रकृती खालावली होती. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. अचानक शुक्रवारी पुन्हा प्रकृती खालावली.
रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महिन्याभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी उत्तरप्रदेशमधील लखनऊ येथे अंत्यसंस्कार केले जाणार (PCMC) आहेत.
[ad_2]