PCMC : स्वयंसेवी संस्थांच्या सहाकार्याने शहरात अभ्यासिका


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास केंद्र उभारण्यात येतील. त्यासाठी संजय गांधीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आदर्श ठरेल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

ad1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘योजक’ स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने मोशी येथील संजय गांधी नगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभारण्यात आली आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय रामगुडे, उप अभियंता मोहन खोंद्रे, योजक संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार, मुख्य लिपिक सुनील माने, कपिल देठे, भागवत दरेकर, योजक संस्थेचे प्रकल्प प्रमुख शाम वावरे, व्यवस्थापक सेजल जोशी, स्वप्ना बोधनी, कल्याणी नगरकर, प्रदीप वाघमारे, रोहित माचरे सामाजिक कार्यकर्ते संतोष कसबे, वसंत वैरागे, रामेश्वर साळवे, मधुकर मिसळे, उत्तरेश्वर वैरागे, मिनिनाथ कांबळे, अजय साळवे, विक्की मिसळे, यशोधरा महिला बचत गटाच्या स्वयंसेविका रेश्मा कसबे, प्रभावती वैरागे, गोदाबाई साळवे, कांताबाई मिसळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेने झोपडपट्ट्यांमधील सार्वजानिक शौचालयांच्या (PCMC) संचालनासाठी “नवी दिशा” हा महिला बचत गटांचा उपक्रम राबविला आहे. याच धरतीवर “नवी दिशा-सर्वांगीण विकासाची” हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने उभारण्यात आलेला अभ्यासिकेचा प्रकल्प वाखाणण्याजोगा आहे. या विभागाच्या वतीने पहिल्यांदाच असा उपक्रम राबविला आहे, त्याचा आनंद आहे. या अभ्यासिकेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तके, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे, मोफत शैक्षणिक मार्गदर्शन, करियर मार्गदर्शन अशा सुविधा देण्यात येणार असून हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे. या उपक्रमाचा अवलंब शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे देखील आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

Akurdi : स्वांतत्र्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार

दरम्यान, अभ्यासिका निर्माण करण्यासाठी प्रयत्न करून हा उपक्रम यशस्वी करणारे सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सत्कार आयुक्त सिंह यांनी केला.

शिक्षणाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना विकासाची संधी मिळते, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना अभ्यासासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य (PCMC) उज्वल होण्यास मदत होऊन त्यांची गुणवत्ता सुधारते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेमध्ये योजक या संस्थेच्या वतीने ने 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करियर विषयक मार्गदर्शन करण्यात येणार असून झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाने वस्तींमध्ये सुरु केलेली ही पहिलीच अभ्यासिका आहे. यापुढे शहरातील इतर भागातही हा उपक्रम सुरु करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.