Pimple Nilakh : मुळा नदीत दुषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच

[ad_1]

एमपीसी न्यूज – मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमी येथे मृत माशांचा खच आढळून आला. (Pimple Nilakh)दूषित आणि केमिकल मिश्रित पाण्यामुळे सातत्याने असे प्रकार घडत आहेत. याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आपचे रविराज काळे यांनी केला आहे.

रविराज काळे यांनी सांगितले की, पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणाऱ्या मुळा नदिपात्रात दूषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फक्त तोडदेखली कारवाई केली जाते.

Pimpri : कर्नाटकातील विद्यार्थ्यांची पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना भेट

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीला अचानक भेट दिली. कंपनीतील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी भेट दिल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र आपले हितसंबंध जोपासून सोशल मिडियावर टाकलेली पोस्ट त्यांनी डिलीट केली. जशा कंपन्यांना अचानक भेटी दिल्या जातात, तशाच भेटी जर पवना, मुळा, इंद्रायणी या नद्यांना द्यायला हव्यात.

केमिकल मिश्रीत पाणी सोडून या जलचर प्राण्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळ नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाने देखील फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. मुळा नदीत मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर पिंपळे निलख येथील नागरिकांनी आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर काळे यांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली. याबाबतची माहिती महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आली असल्याचेही रविराज काळे यांनी सांगितले.



[ad_2]