Pimple Saudagar: पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या नावावर कर्ज घेत केली तब्बल 26 लाखांची फसवणूक


एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करत अज्ञात व्यक्तींनी महिलेला 26 लाखांचा गंडा घातला. महिलेच्या नावाने पार्सल आले असून त्यात अमली पदार्थ असल्याचा बहाणा करून महिलेच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज घेतले. तसेच महिलेच्या खात्यातील रक्कम देखील काढून घेत एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 9 ते 10 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील एका महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9289004065 क्रमांक धारक रघुवीर सिंघ, 9292908774, 928727716 क्रमांक धारक, MUMBAI CYBER CRIME skype ID 0382, 7193, 1199 आणि विविध बँक खाते धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : शाडू मातीच्या मूर्ती वापरास प्राधान्य द्या, महापालिकेचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रघुवीर सिंघ याने फिर्यादी महिलेला फोन करून तो फेडेक्स कुरियर कंपनी मधून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या पार्सल मध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगितले. त्यासाठी पोलीस क्लीयरंस सर्टिफिकेट लागत असल्याचे सांगून स्काईप वरून फिर्यादीकडे चौकशी करायची असल्याचे सांगत त्यांचे नेट बँकिंग नि गुगल पे ओपन करण्यास सांगितले. त्याद्वारे फिर्यादी यांच्या नावावर आयसीआयसीआय बँकेकडून ऑनलाईन 20 लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची रक्कम आणि फिर्यादी यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम असे एकूण 26 लाख 48 हजार 198 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.