[ad_1]
एमपीसी न्यूज – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून सांगणाऱ्या एका तोतया व्यक्तीवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 मे 2025 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात घडली.
ओंकार श्यामराव जोशी (वय 45, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Khed: मनी ट्रान्सफर आयडी वापरून परस्पर पैसे ट्रान्सफर करत दोन लाख 37 हजारांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने स्वतः लोकसेवक म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी हे अधिकारपद धारण केलेले नाही हे त्यास माहित असताना देखील त्याने ते अधिकारपद धारण करण्याचा बहाणा केला. राहत्या परिसरातील अन्य लोकांना तशी त्याने बतावणी केली. तो त्या अधिकारपदावर आहे असा लोकांमध्ये समज व्हावा म्हणून त्याने जाणीवपूर्वक त्या अधिकारपदाचे बनावट व्हिजीटींग कार्ड बनवून घेतले. त्यावर त्याने शासनाच्या परवानगीशिवाय अशोक स्तंभ या राज्य प्रतीकाचा वापर केला. त्याने त्या व्हिजीटींग कार्डचा वापर तोतयागिरी करून लोकांची फसवणूक करण्यासाठी केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
[ad_2]