एमपीसी न्यूज – राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही ( Pimpri ) वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कूल, लिटिल फ्लाॅवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात बालचमूंनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे आला… यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी व कृष्णजन्माष्टमी उत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कूलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन च्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Pune : किरकोळ कारणावरून मित्राकडूनच चाकूने वार करत खून
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणा गीत’ सादर केले. बालचमूंनी राधा – कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत ‘मच गया शोर सारी नगरी रे’, ‘गोविंदा आला रे आला’, ‘बोल बजरंग बली की जय’, या गाण्यावर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फोडताना कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बालगोपालांनी एकच जल्लोष करीत दहीहंडी फोडली. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला यांचे महत्त्व सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी विषयावर ग्रीटिंग कार्ड बनवले होते.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव म्हणाल्या, की सारे मतभेद विसरून, लोभ अहंकार बाजूला सारून, सर्वधर्म समभाव जागवत सर्वांनी एकत्रित येऊन आपुलकीची दहीहंडी फोडूया. विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता, असेही सांगितले. संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी दहीहंडी साजरी करण्यामागील उद्देश सांगून बालगोपाळांचे गुण आत्मसात करा, असे ( Pimpri ) सांगितले.