Pimpri : भाटनगर मध्ये गुंडाचा हैदोस; वृद्ध महिलेवर तलवारीने वार, अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण


एमपीसी न्यूज – पिंपरी मधील (Pimpri)भाटनगर परिसरात एका गुंडाने त्याच्या साथीदारासोबत मिळून हैदोस घातला. टपरी चालक वृद्ध महिलेवर भर दिवसा तलवारीने वार करून जखमी केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या गुंडाच्या दहशतीमुळे भाटनगर परिसारत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मॅड गण्या कांबळे (वय 22, रा. निराधार नगर, पिंपरी) आणि तोफ्या शेख (वय 22) अशी दहशत निर्माण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

पहिल्या प्रकरणात 60 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेची भाटनगर मध्ये टपरी आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारस आरोपी कांबळे आणि त्यचा साथीदार तोफ्या हे टपरीवर आले. त्यांनी टपरी मधून साहित्य खरेदी केले. त्याचे पैसे वृद्ध महिलेने मागितले.

Sangvi: पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक 

आपल्याला पैसे मागितले, याचा राग आल्याने आरोपी कांबळे याने तलवारीने महिलेवर वार केले. महिलेला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात तलवारीने वार केले. तर तोफ्या याने महिलेच्या पाठीत दगड मारून जखमी केले. आरोपींनी वृद्ध महिलेच्या टपरीची तोडफोड केली. यावेळी जमा झालेल्या लोकांना तलवार दाखवत ‘म्हातारीच्या मदतीला कोणी आले तर त्याचा खेळ खल्लास समजा’ अशी धमकी दिली.

याच आरोपींनी भाटनगर मधील बिल्डींग नंबर आठ समोर एका 17 वर्षीय मुलाला मंगळवारी (दि. 27) बेदम मारहाण केली. 17 वर्षीय मुलगा सार्वजनिक शौचालयाजवळ गेला असता आरोपींनी त्याला अडवून त्याची मस्करी केली. मुलाने मस्करी करण्यास विरोध केला असता आरोपींनी मुलाच्या तोंडावर आणि पोटात मारून त्यास जखमी केले. शिवीगाळ करून ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात 17 वर्षीय मुलाच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या गुंडांच्या दहशतीमुळे भाटनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.