एमपीसी न्यूज – शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर (Pimpri) महापालिकेच्या वतीने 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.
यंदाचा गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी विविध सेवा सुविधा पुरविण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने प्रमुख विसर्जन घाटांच्या ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत. त्यामध्ये निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट या विसर्जन घाटांचा समावेश आहे.
Pimpri : झिरो वेस्ट शाळा उपक्रम
याठिकाणी वैद्यकीय पथकांसोबत वैद्यकीय साहित्य, औषधे आणि (Pimpri) सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहे. या वैद्यकीय पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. या सर्व पथकांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्य समन्वय अधिकारी म्हणून सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.