Pimpri : शटर उचकटून तीन कापड दुकानांमध्ये चोरी


एमपीसी न्यूज – पिंपरीतील तीन दुकानांचे शटर उचकटून (Pimpri)आतील 47 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रिव्हर रोड, पिंपरी येथे रविवारी (दि. 18) सकाळी उघडकीस आली.

हरगोविंद हजारीमल तेजवानी (वय 70, रा. साई शिव लिला बंगला, पिंपळे सौदागर) यांनी रविवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dehugaon : 25 वर्षांनी एकत्र आली दहावीची बॅच अन् रंगले सुवर्णक्षण आठवणींचे…!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री नऊ ते रविवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांचे विशाल टेक्सटाइल नावाचे दुकान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून आतील 47 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांच्या शेजारील शुभांगी नावाचे कपड्याचे दुकान आणि राज नावाचे कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी झाली आहे. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.