एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात (Pimpri)मागील तीन महिन्यात डेंग्यू आजाराचे 136 रुग्ण, चिकनगुनिया आजाराचे 23 रुग्ण व झिका आजाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी 4 रुग्ण गर्भवती महिला आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.
तसेच गर्भवती महिलांना झिका व डेंग्यू या आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास जसे की, ताप, सांधेदुखी, डोळयांच्या मागे दुखणे इ. त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला व वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी असे वैद्यकीय विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यू , चिकुनगुण्या व झिका आजारांच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत “डेंग्यू मुक्त पीसीएमसी (BEAT Dengue Campaign)” “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध महापालिका तसेच खासगी शाळेमध्ये, अंगणवाडीमध्ये व परिसरात साफसफाई करून डास उत्पत्ती स्थानके नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात आली.
PCMC : ‘अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग’ जनजागृती मोहिमेस अवघे काहीच दिवस बाकी….
तसेच विद्यार्थांमध्ये व नागरिकांमध्ये सोशल मिडीयाद्वारे तसेच हस्तपत्रिका वाटप करून जनजागृती करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा ताप व इतर डेंग्यू व इतर किटकजन्य आजाराची लक्षणे असल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.