Pimpri : एच. आय. व्ही. बाधितांसोबत गोमय रक्षासूत्राच्या माध्यमातून अनोखे रक्षाबंधन साजरे 

[ad_1]

एमपीसी न्यूज –  मंथन फाऊंडेशन आणि महाएनजीओ फेडरेशन यांच्यावतीने एच. आय. व्ही. बाधित महिलांसोबत ( Pimpri)  आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे करण्यात आले. गोमय रक्षासूत्र बांधत 90 महिलांनी  रक्षाबंधन साजरे केले. गोमय रक्षासूत्र ही पर्यावरण पूरक राखी बांधत महिलांनी गोवंशाचे पालन, संवर्धन आणि रक्षणासाठी एक पाऊल उचलले. 

ad1

Maval : मावळात 97 किलो गांजा जप्त, चार जणांना अटक

‘महा एनजीओ फेडरेशन’चे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून  या एच. आय. व्ही. बाधित 90 महिलांना ‘महा एनजीओ फेडरेशन’ संपूर्ण वर्षभर दर महिन्याला ‘पोषण आहार किट’ देण्यात येत आहेत. यावेळी त्यांना गोमय रक्षासूत्र बांधत महिलांनी त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले. तसेच महिलांना  ‘पोषण आहार किट’ यावेळी देण्यात आले.

यावेळी स्नेहा कलंत्री, संध्या शाह, पिंकी शाह, बबिता गोयल, ज्योती मालपाणी, सीमा सपकाळ, राजेश दिवटे, मंथन फाऊंडेशनच्या अध्यक्षा आशा भट, दीपक निकम उपस्थित होते. महा एनजीओ फेडरेशन’चे वरिष्ठ संचालक मुकुंद शिंदे, संचालक राहुल जगताप, सदस्य रवींद्र चव्हाण आणि अपूर्वा करवा, कोमल गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.  मंथन फाऊंडेशनच्या कविता सुरवसे यांनी ( Pimpri)  प्रास्तविक केले.

[ad_2]