Pimpri : एफसीआयचा एसएससीबीवर 10-0 अशा फरकाने मात; स्पर्धेतील पहिला विजय

[ad_1]

एमपीसी न्यूज : मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर- पिंपरी (Pimpri) येथील चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद 2024 स्पर्धेमध्ये फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) आणि सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड संघांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

हॉकी महाराष्ट्र आयोजित आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने सुरू झालेल्या स्पर्धेत शनिवारी ड गटात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्यात 2-2 अशी बरोबरी झाली. पंजाब नॅशनल बँक आणि केंद्रीय राखीव पोलीस यांच्यातील सामनाही 2-2 अशा बरोबरीत सुटला.

मात्र, आजचा दिवस एफसीआयने गाजवला. त्यांनी तामिळनाडू पोलीस संघाचा 10-0 असा धुव्वा उडविला. परमवीर सिंगने पेनल्टी कॉर्नर आणि पेनल्टी स्ट्रोकसह (4था – पीएस;, 21वा – पीसी., 35वा – पीसी आणि 40वा – पीसी) आणि बॉबी सिंग धामीचे (१३वे, ५७वे, ५७वे, ५२वे) हॅटट्रिकसह चार मैदानी गोल हे त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.NSN 2251 M6

केरोबिन लाक्रा (19वे – पीसी) आणि गणेंद्रजीत निंगोम्बमने (60वे) प्रत्येकी एक गोल करताना त्यांना चांगली साथ दिली. अशाप्रकारे एफसीआयने दिवसातील सर्वात मोठा विजय न

तत्पूर्वी, क गटाच्या दुसऱ्या सामन्यात, सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने (Pimpri) (एसएससीबी) सशस्त्र सीमा बल संघावर 8-0 असा विजय मिळवला. सिरिल लुगुन (१०वा – पीसी, 41वा – पीसी) आणि जोबनप्रीत सिंग (29वा, 30वा) यांनी प्रत्येकी दोन तसेच हरमन सिंग (2रा), सुशील धनवर (32 – पीएस), सुनील (25 वे) आणि अजिंक्य जाधवने (60 वे) प्रत्येकी एक गोल केला.

अ गटामध्ये, भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 7-4 अशा फरकाने इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीपीबी) सेंट्रल हॉकी संघाला हरवत दोन सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

आदित्य लालगे (18वा, 37वा, 45वा), नीरज (34वा; पंकज 39वा – पीसी., 43वा) आणि (अब्दुल अहद 14वा) यांनी साई साठीसाठी गोल केले.

आयटीपीबीसाठी, रोशन (50वे – पीसी), अनिल (52वे – पीसी), दिनाचंद्र मोइरंगथेम सिंग (56वे), मैबाम चिंगखेईंगनबा मीतेईने (59वे – पीएस) प्रत्येकी एक गोल केला. पण त्याची झुंज व्यर्थ ठरली.

दिवसाच्या शेवटच्या सामन्यात, अखिल भारतीय पोलीस क्रीडा (Pimpri) नियंत्रण मंडळाने ब गटात कॅनरा बँकेवर 5-0 असा विजय मिळवला. कॅनरा बँकेला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.

Puja Khedekar : पूजा खेडकरवर केंद्राची मोठी कारवाई, सेवेतून बाहेरचा रस्ता दाखवला

NSN 1945 M2

पोलीस संघाने दोन सामन्यातील पहिला विजय नोंदवला.

आकाशदीप सिंग (२५वे), गुरविंदर सिंग (२९वे – पीसी), दिलप्रीत सिंग (३३वे), हतिंदर सिंग सिंग (३७वे) आणि धरमवीर सिंग (४८वे) यांनी पोलीस दलाकडून गोल केले.

निकाल:

क गट: सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड: 8(हरमन सिंग 2रा; सुशील धनवर 32 – पीएस; सिरिल लुगुन 10वा – पीसी, 41वा – पीसी; सुनील 25 वा; जोबनप्रीत सिंग 29 वा, 30वा, अजिंक्य जाधव 60वा) वि. सशस्त्र सीमा दल 0. मध्यंतर: 5-0.

क गट: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया: 10(परमवीर सिंग 4था – पीएस; 35वा, – पीसी, 35 – पीसी, 21 – पीसी; बॉबी सिंग धामी 13वा, 57वा, 57वा, 52वा; केरोबिन लाक्रा 19 – पीसी; गणेंद्रजीत एन. 60वा) विजयी वि. तामिळनाडू पोलिस: 0. मध्यंतर: 4-0.

ड गट: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल: 2(निथिन 21 वा; अँजेल मिन्झ 58 वा) बरोबरी वि. भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग): 2 (जय प्रकाश पटेल 26 वा; झेस निलम संजीप 49 वा – पीसी). मध्यंतर: 1-1

ड गट: पंजाब नॅशनल बँक: 2(गुरसिमरन सिंग 15वे – पीसी; सतेंदर कुमार 25वे) विजयी वि. केंद्रीय राखीव पोलीस दल: 2 (राहुल शर्मा 43वे; लवप्रीत जैन 52वे). मध्यंतर: 2-0

अ गट: भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई):7(अब्दुल अहाद 14वा; आदित्य लालगे 18वा, 37वा, 45वा; नीरज 34वा; पंकज 39वा – पीसी, 43वा) विजयी वि. व्हीआयटीबीपी सेन्ट्रल हॉकी संघ: 4 (रोशन 50वा – पीसी; अनिल 52वा – पीसी; दिनचंद्र मोइरंगथेम सिंग 56वा; मैबाम चिंगखेईंगनबा मीतेई 59वा – पीएस). मध्यंतर: 2-0

ब गट: कॅनरा बँक 0 पराभूत वि. अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियंत्रण मंडळ (एआयपीएससीबी): 5(आकाशदीप सिंग 25वा; गुरविंदर सिंग 29वा – पीसी; दिलप्रीत सिंग 33वा; हतिंदर सिंग सिंग 37वा; धरमवीर सिंग 48वा). मध्यंतर: 0-2

[ad_2]