Pimpri : निकृष्ट कामे; 11 ठेकेदार  काळ्या यादीत

[ad_1]

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरून निकृष्ट कामे ( Pimpri)  करणा-या 11 ठेकेदारांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चांगलाच दणका दिला आहे. 11 ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून निकृष्ट झालेल्या कामाचे दुप्पट पैसे वसूल करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे.

शहरात महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे केली जातात. मात्र, स्थापत्य विभागातील रस्ते दुरूस्ती, पेव्हींग ब्लाॅक, मातीचे जाॅगिंग ट्रॅक यासारखी कामे घेताना 11 ठेकेदारांनी 14 विकास कामात तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरल्या हाेत्या. मात्र, एवढ्या कमी दरात कामे घेतल्यानंतर त्याचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहिल का? याची आयुक्त सिंह यांना खात्री ( Pimpri) नव्हती. त्यामुळे सिंह यांनी अशा 11 कंत्राटदाराच्या 14 कामाचा दर्जा तपासण्याचे आदेश महापालिका दक्षता विभागाला सप्टेंबर 2022 मध्ये दिले होते.

Maval : झाडे जगवणाऱ्या हातांचा गौरव

दक्षता विभागाने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सीओईपीचा) कडून कामांच्या दर्जाची तपासणी करून घेतली. सीओईपीने केलेल्या तपासणीत पेंव्हीग ब्लाॅकच्या कामात ब्लाॅक खचलेले, ज्याठिकाणी दुरूस्ती आवश्यक अशा ठिकाणी दुरूस्तीच केली नाही, महापालिका मानांकनानुसार काम नाही, रस्ते दुरूस्ती केल्यानंतर त्वरित खड्डे पडणे, काॅक्रिट थराची जाडी कमी असणे, जाॅगिंग ट्रॅकवर कमी माती टाकणे, निविदेनुसार काम न करणे अशा विविध धक्कादायक बाबी समाेर आल्या. या तपासणीचा अहवाल काही महिन्यांपूर्वी आयुक्तांना सादर करण्यात आला हाेता.

या अहवालानंतर महापालिकेने निकृष्ट कामे करणा-या 11 ठेकेदारांना कारणे दाखवा नाेटीस पाठवून खुलासा सादर करण्याचा आदेश दिला ( Pimpri) हाेता. मात्र, एकाही ठेकेदाराने समाधानकारक खुलासा सादर केला नाही. यानंतर आयुक्त सिंह यांनी सर्व ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहर अभियंता मकरंद निकम यांनी 11 ठेकेदारांना एका वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा आदेश काढला आहे. तसेच ठेकेदारांकडून निकृष्ट झालेल्या कामाचा दुप्पट खर्च वसूल करण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

‘हे’ ठेकेदार एक वर्षांसाठी काळ्या यादीत

अजय घनश्याम खेमचंदानी, अनिकेत एंटरप्रायजेस, चैताली सप्लायर्स, कविता एंटरप्रायजेस, काव्या असाेसिएटस,माेटवानी अँण्ड सन्स, नामदे एंटरप्रायजेस, आर.जी. मंगळवेढेकर, रामचंद्र एंटरप्रायजेस, सनसारा कन्स्ट्रक्शन, साेहम एंटरप्रायजेस या 11 ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे या ठेकेदारांना महापालिकेच्या काेणत्याही निविदेप्रक्रियेमध्ये सहभागी हाेता ( Pimpri) येणार नाही.

[ad_2]