Pimpri : ‘शहरातील वाहतूककोंडी सोडवा’


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये नियोजनबद्ध प्रशस्त रस्ते  आहेत.  मात्र वाहतूक पोलिसांचे झालेले दुर्लक्ष यामुळे विविध चौकामध्ये, विविध ठिकाणी वाहतूक कोंडी (ट्राफिक जाम)  होत असल्यामुळे सामान्य नागरिकांना, वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. तो दूर करण्यात यावा अन्यथा लवकरच आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशारा दिल्यानंतर पत्र वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे यांनी  कामगार नेते काशिनाथ नखाते व शिष्ठमंडळांशी चर्चा  केली.  मागण्यावर सकारात्मक विचार करून लवकरच त्या सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी  प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने ,कार्याध्यक्ष इरफान चौधरी ,सहदेव होनमने, संभाजी वाघमारे,रवींद्र गायकवाड, संजय कांबळे उपस्थित होते. रस्त्यावर असलेले खड्डे व वाहतुकीचा प्रचंड ताण लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे आहे वाहतूक पोलीस इतर कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक सुरळीत करण्याकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. विशेषतः  काळेवाडी फाटा , शागुन चौक ,टिळक चौक निगडी, दुर्गानगर चौक, चिखली, तळवडे,  त्रिवेणी नगर चौक, आकुर्डी चौक, मोरवाडी चौक,  साने चौक  थरमॅक्स चौक परिसरात अवैध थांबा, अनेक वेळेला खूप मोठ्या प्रमाणात कोंडी  होते आहे.

Pimpri : दोन आठवड्यानंतरही निळ्या पूररेषा सर्वेक्षण सुरूच

सांयकाळी वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो ,अवैध पार्किंग मुळे सामान्य नागरिकांचा प्रवास अवघड झाला आहे . वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनावरती कारवाई सुरू असून चुकीच्या कामाचे समर्थन पोलीस विभागाकडून करण्यात येणार नाही त्याचबरोबर दंडात्मक कारवाई सुरू असून वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.