[ad_1]
एमपीसी न्यूज – पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा (Pimpri) करण्यासाठी विसर्जनानंतर मूर्तीदान व संकलन केंद्रांची 85 ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनीही मूर्तीदान करून अथवा कृत्रिम विसर्जन घाटांवर मूर्ती विसर्जित करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शालेय स्तरावर पर्यावरणपूरक गणेश मुर्ती निर्मिती व सजावट स्पर्धा आयोजित करणे, नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय विसर्जनाच्या दिवशी सर्व विसर्जन घाटांवर आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यावर महापालिकेने भर दिला आहे.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय गणेशमूर्ती दान केंद्र
‘अ’ क्षेत्रीय कार्यालय
साई उद्यान संभाजीनगर, शिवशाहू गार्डन, पिरॅमिड हॉल, शाहूनगर कापसे उद्यान, मोरवाडी, विठ्ठल मंदीर, आकुर्डी, सेन्ट उर्सुला स्कूल गेट आकुर्डी, मोहननगर सांस्कृतिक भवन, दुर्गे चौक, काळभोरनगर, गणेश तलाव जवळ, से. क्र, 26 प्राधिकरण नियोजित महापौर निवास मैदान, से. क्र. 27 प्राधिकरण, खान्देश मराठा मित्र मंडळ, काचघर चौक, से. क्र. 24 प्राधिकरण, कै. पांडुरंग बुवा काळभोर सभागृह, आकुर्डी गावठाण, एम्पायर इस्टेट पुलाखाली, चिंचवड पारिजात बन, सुदर्शननगर, मदर तेरेसा पुलाखाली हॉटेल ईगल जवळ, लिंकरोड, चिंचवड
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
मामुर्डी स्मशानभूमी घाट, महादेव मंदिर, किवळे गावठाण, पंचशीलनगर, किवळे, स्मशानभूमी घाट, किवळे, मळेकर वस्ती, जाधव घाट रावेत, चिंचवडगाव, थेरगांव पुल, बिर्ला हॉस्पिटलजवळ, जिजाऊ पर्यटन केंद्र शेजारी एस टी पी प्लांट जवळील घाट (Pimpri) चिंचवडगाव, दशक्रिया घाट (जुनी स्मशानभूमी), चिंचवडगाव, केळकर घाट, काकडे पार्क चिंचवडगाव, लक्ष्मीनगर चिंचवडगाव हौद, स्मशानभुमी जवळ, काळेवाडी, आयप्पा मंदिर घाट, नढेनगर, काळेवाडी, ज्योतिबा गार्डन जवळ, काळेवाडी
‘क’ क्षेत्रीय कार्यालय
चिखली स्मशान घाट, मोशी दशक्रिया घाट, गावजत्रा मैदान, भोसरी (अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळ), जलवायु विहार शेजारील मैदान, सेक्टर 6 मोशी, प्राधिकरण क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी
‘ड’ क्षेत्रीय कार्यालय
पुनावळे, राम मंदिराच्या शेजारील घाट, स्मशानभूमी घाट ताथवडे, स्मशानभूमी घाट, वाकड गावठाण घाट, इंगवले पुल घाट, चौंधे घाट, कस्पटे वस्ती स्मशानभूमी घाट, पिंपळेनिलख मनपा शाळा, कस्पटे वस्ती मनपा शाळा, दत्तमंदिर घाट, पिंपळेगुरव घाट, तुळजाभवानी मंदिरासमोर माध्यमिक विद्यालय शाळा इमारत, बस स्टॉप समोर, पिंपळेगुरव, बुद्ध विहार, सृष्टी चौकाजवळ, पिंपळेगुरव, स्प्रिंग बिल्डींग, डॉमिनोज पिझ्झा खालील पार्किंग, काशिद पार्क, बी.आर.टी रोड, पिंपळेगुरव
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय
चऱ्होली घाट जवळ (इंद्रायणी नदी), अलंकापूरम सोसायटी, तापकीर चौक, वडमुखवाडी डुडूळगाव घाट (इंद्रायणी नदी)दाभाडे सरकार चौक, हनुमान कॉलनी, देवेंद्र देवकर यांच्या घराजवळील मैदान, देवकर वस्ती, भोसरी, डोळस मैदान, दिघी गावठाण, कृष्णानगर, दिघी, बोपखेल घाट, राघव मंगल कार्यालय, दिघी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरील मैदान, दिघी रस्ता भोसरी, गंगोत्री पार्क, दिघी रस्ता भोसरी, बापुजी बुवा चौक, भोसरी
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय
म्हेत्रेवस्ती शाळा, चिखली, एकता चौक, रुपीनगर, निघोजे पुल, तळवडे, तळवडे गावठाण, ठाकरे ग्राऊंड, (Pimpri) यमुनानगर, शनिमंदिर, पुर्णानगर, टॉवर लाईन, तुळजाभवानी मंदिर, ताम्हाणेवस्ती, गणेश नगर, पांडुरंग पार्क तळवडे
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय
पवनेश्वर घाट, पिंपरीगाव, जुलेलाल घाट, पिंपरी कॅम्प, स्मशानभुमी घाट, जगतापनगर, थेरगाव, केजू देवी बंधारा, बिर्ला हॉस्पिटल मागे, महादेव मंदिर घाट, काटे पिंपळे, पवनानगर घाट, रहाटणी गावठाण
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय
कासारवाडी स्मशानभूमी लगत, फुगेवाडी स्मशानभूमी लगत, दापोडी हॅरिस ब्रिज घाट, दापोडी बॉम्बे कॉलनी घाट, श्री वेताळ महाराज घाट, जुनी सांगवी, श्री. दत्त मंदिर घाट, जुनी सांगवी, पवनानगर घाट, जुनी सांगवी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, सांगवी, वल्लभनगर पाण्याच्या टाकीजवळ विसर्जन एम. के. हॉटेल चौक, नवी सांगवी, फेमस चौक सांगवी
[ad_2]