Pimpri : संत तुकारामनगर येथील म्हाडा वसातीमधील समस्या सोडवा; यशवंत भोसले यांची शिवाजीराव आढळराव यांच्याकडे मागणी


एमपीसी न्यूज – पिंपरीतील (Pimpri)संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या वसातीमधील अत्य अल्प उत्पन्न गटातील LIG ची इमारत क्रमांक 197 ते 213 मधील 947 घराणमधील मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्विकास करावा. त्यांना दोन बेडरूम किचन व हॉल असे किमान 1100 स्कवेअर फूटचे घर द्यावे. इतर स्कीम मधील स्वतः रहिवाशांनी बांधलेल्या घरांना वाढीव बांधकामांना मान्यता देऊन या घरांवर बँकेचे लोन काढण्यासाठीचे ना-हरकत प्रमाणापत्र म्हाडाने देण्याची मागणी कामगार नेते यशवंत भोसले यांनी पुणे गृह निर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याकडे केली.

पुन्हा अध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर आढळराव-पाटील यांनी संत तुकारामनगर येथील म्हाडाच्या वसाहतीला भेट दिली. त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. माजी खासदार अमर साबळे, म्हाडाचे मुख्याधिकारी अशोक पाटील, मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर, अधिकारी प्रकाश वाबळे, प्रा. दत्तात्रय भालेराव उपस्थित होते.

Khed :पत्नी व भावजयीला ला बेदम मारहाण पतीविरुद्ध गुन्हा दाखल

यशवंत भोसले म्हणाले, महाराष्ट्रातील कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले आहेत. कायम कामगारांचे जागेवर सुरु असलेल्या कंत्राटी पद्धतीमुळे राज्यातील करोडो तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. कोविड महामारीत अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या, राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे वतीने आम्ही लढे देत आहोत. परंतु संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार युनियन करताच कामगारांना कामावरून काढून टाकले जाते. न्यायालय न्याय देते, त्याची अंमलबजावणी उद्योजक तर करत नाहीतच. परंतु पालिकेतील आयुक्त, जिल्हाधिकारी देखील करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक लावून कामगारांचे प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांनी केली.

संत तुकाराम नगर मधील म्हाडाच्या घराच्या मागण्या

अत्य अल्प उत्पन्न गटातील LIG ची इमारत क्रमांक 197 ते 213 मधील 947 घराणमधील मोडकळीस आलेल्या घरांचे पुनर्वीकास Redevelopment करणे त्यांना दोन बेडरूम किचन व हॉल असे किमान 1100 स्कवेअर फूटाचे घर द्यावे. इतर स्कीम मधील स्वतः रहिवाशांनी बांधलेल्या घरांना वाढीब बांधकामांना मान्यता देऊन या घरांवर बँकेचे लोन काढण्यासाठी ना-हरकत म्हाडाने द्यावी. घराच्या मूळ किमतीवर 2% रक्कम घेऊन रिसेलरचे नावावर घर करून द्यावे. गळत असलेल्या म्हाडाच्या इमारती त्वरित दुरुस्त करून द्याव्यात. व्यापारी संकुलाचा पुनर्विकास करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण सुवर्णा यांनी केली. त्यावर या प्रश्नांबाबत लवकच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन आढळराव- पाटील यांनी दिले. रहिवासी व उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी सूत्रसंचालन केले. स्थानिक नेते नंदुअप्पा कदम यांनी आभार मानले.

या प्रसंगी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक बबन गाडवे,ऍड.अतुल गुंजाळ, दिपक पाटील, दिनेश पाटील,राहूल शितोळे,मिलिंद देशपांडे, दत्तात्रय गायकवाड, रामचंद्र देवकर,अमोल घोरपडे, अजय पवार,सुरेश इंगळे, लता पाटील, रिबेका अमोलिक,रजनी मगर,प्रिया जाधव-घोरपडे , मानसी देशपांडे उपस्थित होते. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद व कामगार प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.