Pimpri : स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाची आगेकूच; पीएसपीबी, आरएसपीबीप्रमाणे सलग दुसरा विजय


एमपीसी न्यूज : गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (Pimpri), उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) आणि स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड संघांनी (एसपीएसबी) चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सातत्य राखताना दुसऱ्या विजयाची नोंद केली.

मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत लागोपाठ दोन विजयांसह त्यांनी अनुक्रमे पूल-अ आणि ब मधून पुढील फेरी गाठण्याच्या त्यांच्या शक्यता बळकट केल्या आहेत.

NSN 1720

दिवसाची सुरुवात पीएसपीबी संघाने (पेट्रोलियम) अ गटामध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाविरुद्ध (साई) 4-3 अशा विजयाने केली. खेळाच्या शेवटच्या पाच मिनिटांत सुमित कुमारने (५५वा – पीसी, 56वा) दोन गोल केल्याने निकाल पीएसपीबीच्या बाजूने लागला. तत्पूर्वी, तलविंदर सिंगने (१५व्या – पीसी आणि 29व्या) पेट्रोलियम संघाचे खाते उघडले. मोहम्मद सैफ खान (36वे -पीएस, 43वे – पीएस) आणि सोमकर गोपी कुमारने (37वे) साईकडून गोल करताना चांगली लढत दिली.

अ गटातील अन्य सामन्यात, केंद्रीय सचिवालयाने पहिल्या दिवसाच्या पराभवातून बोध घेत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचा 3-2 असा पराभव केला.

NSN 1557

ब गटामध्ये सर्व सामने एकतर्फी सामने झाले.

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाने कॅनरा बँकेवर 14-0 अशा मोठ्या फरकाने मात असा केली. त्यात परदीप सिंग आणि गुरसाहिबजीत सिंगचे प्रत्येकी तीन गोलचे योगदान राहिले. अमनदीप लाक्रा, जसजित सिंग कुलार, युवराज वाल्मिकी, दर्शन विभव गावकर, शिवम आनंद, सिमरनजोत सिंग यांनी प्रत्येकी एक तर जोगिंदर सिंगने दोन गोलांची भर घातली.

ब गटामधील शेवटचा सामनाही एक एकतर्फी झाला . त्यात स्टील प्लांट स्पोर्ट्स (Pimpri) बोर्डाने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकादमीवर 12-3 असा विजय मिळवला. गुजरात संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Pimpri : 428 गणेश मंडळांपैकी 243 गणेश मंडळांच्या अर्जांना ऑनलाइन परवानगी

अजयकुमार बारिया, चुडासामा जयपालसिंह आणि भूरिया प्रेमकुमार यांनी गुजरातसाठी गोल केले. जुनुल पूर्तीने (7वा) स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्डाचे खाते उघडले. त्यानंतर, स्टील प्लांट संघाकडून सेम मुंडा, दिलबर बार्ला, बारा रबी आणि अब्दुल कादिर यांनी प्रत्येकी दोन गोल आणि लाक्रा संदीप, मोहम्मद शाहिद आणि बारला बिशाल यांनी प्रत्येकी एक गोल केला.

NSN 1440

निकाल

अ गट: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड: 4 (तलविंदर सिंग 15वा – पीसी, 29वा; सुमित कुमार 55वा – पीसी, 56वा) विजयी वि. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई): 3 (मो. सैफ खान 36वा – पीएस, 43वा) – पीएस; सोनकर गोपी कुमार ३७वा). हाफटाइम: 2-0

अ गट: केंद्रीय सचिवालय: 3 (मोहम्मद शरीक 8वा – पीसी, 42 वा – पीएस; अनिकेत गुरव 36 वा – पीसी) विजयी वि. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस: 2 (प्रणम गौडा 50वा – पीसी, 53वा – पीसी). हाफटाइम: 1-0

ब गट: कॅनरा बँक 0 पराभूत वि. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड: 14 (परदीप सिंग 2रा, 26वा; 31वा – पीसी; अमनदीप लाक्रा 6वा – पीसी; गुरसाहिबजीत सिंग 8वा, 48वा, 49वा; जसजित सिंग कुलार 15वा; युवराज सिंग वाल्मिकी 29वा; जोगिंदर सिंग 39 पीसी, 46वा पीएस; दर्शन गावकर 40वा; शिवम आनंद 53 वा, सिमरनजोत सिंग 58वा. हाफटाइम: 0-6

पूल-ब: स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात – हॉकी अकादमी: 3 (अजयकुमार बारिया 10वे – पीएस; चुडासामा जयपालसिंह 11वे; भुरिया प्रेमकुमार 59वे – पीसी) पराभूत वि. स्टील प्लांट स्पोर्ट्स बोर्ड: 12 (जूनुल पूर्ती 7, सेम मुंडा 19वा – पीसी . 19वा. 29 पीसी; दिल्बर बर 27, 30वे, बारा राबी 37वें, 57वे, संदिप लाक्रा 48वे, मोहम्मद शाहीद 44वा, अब्दुल कादिर 48, 49वा; बरला विशाल 56) हाफटाईम: 2-5

youtube.com/watch?v=IOYZxQkal4M