[ad_1]
एमपीसी न्यूज – गणरायाचे आगमन उद्या (Pimpri Chinchwad) घरोघरी होणार असून या कालावधीत शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज झाले आहेत.
श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेने पार पाडावा व कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निमार्ण होऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. 1 पोलीस सह आयुक्त, 1 अपर पोलीस आयुक्त, 6 पोलीस उप आयुक्त, 11 सहायक पोलीस आयुक्त, 53 पोलीस निरीक्षक, 245 सहायक पोलीस निरिक्षक / पोलीस उपनिरिक्षक 2 हजार 338 पोलीस अंमलदार, 550 होमगार्ड, 1 एसआरपीएफ कंपनी, बीडीडीएस पथक, 11 आरसीपी स्ट्रायकिंग एवढा बंदोबस्त तैनात असणार आहे.
Alandi : आळंदीमध्ये पुणे जिल्हा पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक उत्साहात
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन यांनी सर्व गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकीमध्ये गणेश उत्सव हा उत्साहाने व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही त्या दृष्टीने सर्व सूचना (Pimpri Chinchwad) देण्यात आलेल्या आहेत. सर्व नागरिकांनी व गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, कार्यकर्त्यांनी सदर सुचनांचे पालन करावे याबाबत पोलीस आयुक्तांनी आव्हान केले आहे.
[ad_2]