PMPML News : गणेशोत्सवात पीएमपीएमएल कडून रात्रभर बस सोडण्याचे नियोजन


एमपीसी न्यूज – दरवर्षी प्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (PMPML News) गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहराबाहेरून व शहरांतर्गत नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तसेच पिंपरी-चिंचवड शहरामधून पुणे शहरामध्ये गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या पाहता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य बस स्थानकांवरून दरवर्षी प्रमाणे यंदाही गर्दीनुसार रात्रभर बससेवा सुरू ठेवली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर परिसरातील नऊ स्थानकावरून दररोज 270 ज्यादा बसेस या रात्रपाळीकरीता गणेशोत्सव कालावधीमध्ये सोडल्या जाणार आहेत.

गणेशोत्सव कालावधी मध्ये नियमित मार्गाच्या बसेसच्या फेऱ्या वगळून जादा देण्यात येणाऱ्या फेऱ्या यात्रा स्पेशल म्हणून संचलनात राहतील. या फेऱ्यांसाठी रात्री दहा नंतर प्रचलित दरामध्ये रूपये पाच जादा दर आकारणी केली जाईल.

गणेशोत्सव कालावधीत देण्यात येणारी ही रात्री बससेवा खास बससेवा असल्याने सर्व (PMPML News) पासधारकांस रात्री 12 वाजेपर्यंत पासाची सवलत ठेवण्यात आलेली आहे. रात्री 12 नंतर कुठल्याही प्रकारचे पास चालणार नाहीत.

या स्थानकांवरून सुटणार ज्यादा बस

निगडी – 70

चिंचवडगाव – 35

भोसरी – 62

पिंपळे गुरव – 20

सांगवी – 15

आकुर्डी रेल्वे स्टेशन – 16

चिंचवडगाव मार्गे डांगे चौक – 30

मुकाई चौक रावेत – 12

चिखली/संभाजीनगर – 10