एमपीसी न्यूज : पुणे-नगर महामार्गावरील दोन (Pune) दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. रस्त्यावरून दुचाकीने अचानक वळण घेताना हा भीषण अपघात घडला.
संदीप गाडीलकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना 20 ऑगस्ट रोजी पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव या ठिकाणी घडली.
अज्ञात चालक हा पुणे ते नगर जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता ओलांडून कर्डलवाडीकडे जात होता. त्यावेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने दुचाकीस्वार अचानक वळल्यामुळे पुण्याच्या दिशेने येणारे संदीप नामदेव गाडीलकर आणि दत्तात्रय धुमाळ यांची अज्ञात चालकाच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
Pune :वैज्ञानिक दृष्टिकोन हा डॉ. अभ्यंकर यांच्या जगण्याचा मूलाधार;आदरांजली सभेत आठवणींना उजाळा
या अपघातात संदीप गाडीलकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर (Pune) दुचाकी चालक दत्तात्रय धुमाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.