एमपीसी न्यूज – पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होत आहे. उद्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना (Pune )होणार आहे. त्यानिमित्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत काहीसा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
गणेशमूर्ती विक्री करणारे स्टॉल मोठ्या प्रमाणात डेंगळे पुल ते शिवाजी पुलाचे श्रमिक भवन समोर (आण्णाभाऊ साठे चौक) आणि कसबा पेठ पोलीस चौकी ते जिजामाता चौक तसेच मंडई आणि सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रोड) या भागात असतात. त्यामुळे हा वाहूतक बदल केला आहे. सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री १२ दरम्यान वाहतूक बदल असणार आहे.
वाहतुकीत बदल असा असेल
शिवाजी रोड- गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
पर्यायी मार्ग
– गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
– शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
– झाशी राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवेस जाणाऱ्या वाहन चालकांनी खुडे चौकातून मनपा पुणे समोरून मंगला चित्रपट गल्लीतून कुंभार वेस किंवा प्रिमियर गॅरेज चौक शिवाजी पुल मार्गे, गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभार वेस चौक.
– सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.
– मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे.
Vanraj Andekar : सोम्या गायकवाडला आंदेकर टोळीच संपवायची होती…. पोलीस तपासात धक्कादायक खुलासे
वाहतुकीस खुले रस्ते
– फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
– आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
– मंगला चित्रपटगृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते कुंभार वेस
वाहने लावण्यासाठी व्यवस्था
– न्या. रानडे पथावर कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौक दरम्यान एका बाजुला वाहने लावण्यास परवानगी
– वीर संताजी घोरपडे पथावरील महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चौकदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने लावण्यास परवानगी
– टिळक पूल ते भिडे पूलदरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर वाहने लावण्या परवानगी
– मंडईतील मिनर्व्हा आणि आर्यन वाहनतळ येथे वाहने लावता येतील.
– शाहू चौक (फडगेट पोलिस चौकी) ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावता येणार आहेत.
पीएमपी मार्गात बदल
शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गात बदल केला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील. महापालिकेकडून (Pune ) स्वारगेट कडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.