एमपीसी न्यूज – पुण्येश्वर , पाताळेश्वर, मुठेश्वर, पांचाळेश्वर, ओंकारेश्वर ही प्रमुख मंदिरं मुठा नदीच्या काठावर आहे. सह्याद्रीच्या ( Pune ) कुशीत वसलेल्या या पुनवडी गावाचे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून पुण्याचे संरक्षण केले. पानिपतच्या रणभूमीवर याच पुण्याने अहमदशहा अब्दालीच्या सैन्याला रोखले व हौतात्म्य पत्करले. लहुजी वस्ताद, वीर उमाजी नाईक यांनी इंग्रजी अधिकारी व सैन्याविरूध्द लढा दिला.
गणेश खिंडीत चाफेकर बंधूंनी रॅ॑ड या इंग्रजी अधिकाराचा वध केला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना लोकमान्य टिळकांनी केली. गणेशोत्सव साजरा केला. महात्मा फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला. सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली. ज्ञान उपासकांचे शहर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा पुण्यात वास्तव्य केले होते.
राष्ट्रीय सेवावृत्तीच्या सर्व महान व्यक्तींनी पुणे आपले आवडते शहर म्हणून ओळख मिळवून दिली. लेखकांच्या पुस्तकात भेटणारे पुणे संत ज्ञानेश्वर माऊली , तुकाराम महाराज, श्री जंगली महाराज, श्री शंकर महाराज यांचे पुणे , पेन्शनरांचे पुणे, जागतिक स्तरावर चर्चा करण्यात चतुर असणारे पुणे, सर्व विद्यांचे माहेरघर ते आयटी व्यावसायिक शहर, मेट्रो सिटी, संतांचे पुणे, भारतीय सैन्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या संस्था देशाचे दक्षिण मुख्यालय, सीएमई , एनडीए , दारूगोळा कारखाना असणारे पुणे अनेक नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आकांक्षा असणारे पुणे. कस धुमसते आहे या कडे दुर्लक्ष नक्कीच झाले.
Pimpri : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसह सात हजार नावे
मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील अनेक गावांमधील कुटुंब पुण्यात स्थिरावली. इतपत ठीक होते. परंतु संपूर्ण देशातील अनेक ठिकाणच्या ( Pune ) लोकांनी मुंबईतील जागा संपल्यावर पुणे हेच खरे आपले घर मानले.
रोजगार नोकरी शिक्षण या व अशा अनेक गोष्टी मुळे पुणे शहर अवास्तव वाढत गेले. विकास आराखडा , शहर निर्माण नियोजन नावापुरते ठरले. अनेक ठिकाणी झोपडपट्टी वाढली. रूंद रस्त्यावर अतिक्रमण करून विक्रीला बसणारे परप्रांतीय फेरीवाले आले.
शासकीय अधिकारी सर्व पक्षीय राजकारणाशी मैत्री करून बेकायदेशीर बांधकाम सुरू झाले. व्यापारी, निवासी बेकायदेशीर बांधकाम व्यावसायिक वाढले. निवडणूका जवळ आल्या की कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी आपल्या सोयीनुसार फायदे घेतले.
पेठा, उपनगर परिसर कमी होत म्हणून शासनाने सर्वच झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची अधिकाधिक कामेही केली. सरकारी घरं मिळून
सुध्दा काही स्वार्थी मंडळीनी डोंगर आणि टेकडीवर असलेल्या जागांवर घरे बांधून विकायला सुरुवात केली. या विषयावर आणखी संशोधन करून 7/12, जुने वाडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उदयास आले.
मूळ मालकांना साम दाम दंड भेद सर्व काही मार्ग वापरून जागांसाठी झोडपू लागले. पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमध्ये बिल्डर, इंजिनिअर यांची नवी पिढी निर्माण झाली. गावांची शेती, पशुधन, निसर्ग सौंदर्य संपले. गावांची नावे दुसरे घर, फार्म हाऊस झाली.
तरीही सह्याद्रीच्या रांगा निवांत होत्या. मावळ मुळशी हवेली तालुक्यातील जिथे जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणत आयाबाया पांडुरंग भक्तीमध्ये लीन होऊन घरकाम करायच्या, मंदिरात भाविकांची गर्दी किर्तन भजनात दंग होऊन जायची. तेथे प्लाॅट , गुंठेवारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खननात बिल्डर लाॅबी दंग होऊ लागली.
Sangvi : वाहने फोडणाऱ्या सराईत गुंडाची सांगवी पोलिसांनी काढली धिंड
डॉ. माधव गाडगीळ यांच्या पर्यावरण विषयक माहितीपर मार्गदर्शनपर अहवालात अनेक ठिकाणी संपूर्ण पश्चिम घाट पश्चिम महाराष्ट्र ( Pune ) नैसर्गिक धोकादायक परिस्थिती जाऊ शकतो. असे अनेक ठिकाणी सरकार दरबारी नोंद करून ठेवले गेले.
डॉ. माधव गाडगीळ यांच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त सूचनांचा विचार केला गेला नाही. सर्व काही सरकारने करावे ही मानसिकता तयार होऊन जनता , राजकीय पक्ष, नेते, निवांत राहिले. उन्हाळ्यात दुष्काळ पडावा अशी पाणी टंचाई व पावसाळ्यात जलमय पुणे असा प्रवास पुण्याचा सुरू आहे.
सांगली, कोल्हापूर नंतर पुणे नैसर्गिक धोकादायक परिस्थिती जाऊ शकते हे सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. आपण मात्र सर्व खोटं ठरत या विश्वात रमलो.
प्लास्टिकचा अतिरेकी वापर करून आपण या आपत्तीस निमंत्रण दिले. पुणे शहरातील विविध भागात नुकसानदायक पाऊस पडला तर न भूतो न भविष्यति अशा पावसाने खूप नुकसान होईल. शहरातील विविध भागात विकास कामे सुरू आहेत. सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात मनपा कर्मचाऱ्यांच्या मर्यादा आहेत.
काही ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा नाल्यांमध्ये ड्रेनेजमध्ये टाकणारे अर्धवटराव आहेत. उगीचच शुभेच्छा देण्यासाठी खोटे फॅन्स क्लब तयार करून फ्लैक्स बोर्ड फ्लेक्स बोर्ड लावणारे नंतर तो फ्लैक्स कोणत्या नाल्यांमध्ये ड्रेनेजमध्ये जातो आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवतो. याचा विचार कुणीही करत नाही.
नदीच्या दोन्ही बाजूला पूर रेषा ब्लू लाईन शासनाने ठरविली आहे. तसेच किमान नदी पात्रापासून किमान काही अंतरावर कोणत्याही प्रकारची बांधकामे प्रकल्प सुरू करू नये असे नियम असताना मोठे 12 मजली पेक्षा जास्त मोठ्या इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स, लग्न कार्यालय , रेस्टॉरंट कशी उभी राहिली ? मनपा प्रशासन , वॉर्ड ऑफिस, महसूल विभाग, पाटबंधारे विभाग , स्थानिक पुढारी त्या परिसरातील पर्यावरण प्रेमी इत्यादी चे कसे दुर्लक्ष झाले ?
नदी पात्रातील 7/12 खरे की खोटे हे सुद्धा कोणी तपासले की नाही? टाऊन प्लॅनिंग हे फक्त जिल्हा नियोजन समितीच्या कागदावर राहिले आहे. दररोज ड्रेनेज, तुंबलेल्या गटारी अशा घटना नकळत घडत असतात. मग आपण बेसावध असताना नकळत पणे नैसर्गिक आपत्तीचा परिचय होतो. हा फक्त नैसर्गिक आपत्तीचा हो आपत्तीचा ट्रेलर होता. पिक्चर बघायचा की नाही हे आपल्या हातात आहे.
नैसर्गिक इशारा दुर्लक्षित करून चालणार नाही. भलेही या पावसामुळं घडलेल्या घटनांची कारणे वेगवेगळी असतील. परंतु, वेळ अजूनही गेली नाही. पुण्याचे पुण्य ( Pune ) अजून तरी संपले नाही.
पर्यावरणाचे संरक्षण करा.
लेखक- अमित सुरेश साळुंके,
शिवाजीनगर, पुणे-5
मोबाईल नंबर 88056 96524