Pune : कातकरी कुटुंबांसाठीच्या पक्क्या 15 घरांचे लोकार्पण

[ad_1]

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यात (Pune) वाडा येथे हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेच्या वतीने कातकरी कुटुंबांकरीता बांधण्यात आलेल्या 15 पक्क्या घरांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोनाथन रॉकफॉड, उपाध्यक्ष एलिजाबेथ सातोव, सरपंच रुपाली मोरे, उपसरपंच रोहीदास शेटे, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र म्हस्के आदी उपस्थित होते.

Pune : स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला मेसेज करुन काढली छेड; मनसैनिकांनी दिला चोप

पाटील म्हणाले, कातकरी कुटुंबांना उपलबध करुन देण्यात आलेल्या घरकुलांचा त्यांनी चांगला वापर करावा. कुटुबांनी नियमित शौचालयाचा वापर करावा. उर्वरित कातकरी कुटुंबाना केंद्रपुरस्कृत पीएम-जनमन योजनेअंतर्गत घरकुल, जलजीवन मोहिमेंतर्गत नळयोजना, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना अशा विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. कातकरी (Pune) कुटुंबांचे जीवनमान उंचाविण्याकरीता प्रशासनाने काम करावे, असेही श्री. पाटील म्हणाले.

श्रीमती कडू म्हणाल्या, हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या कंपनीमार्फत बांधण्यात आलेली घरकुले ही नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक बांधकाम असलेली आहेत. त्यामुळे या कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होतील. शिंदे यांनी कंपनीच्या वतीने तालुक्यात करण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण कामाची माहिती दिली.

ग्रामपंचायत वाडा येथे एकूण 41 कातकरी कुटुंबे वास्तव्यास असून या कुटुंबाच्या घरांची अवस्था अत्यंत बिकट होती. पावसाळ्यात या घरांची दुरवास्था होऊन आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत असे. पंचायत समिती खेड व ग्रामपंचायत वाडा यांच्या संयुक्त पुढाकाराने हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया या संस्थेने वाडा येथील कातकरी वस्तीचे सर्वेक्षण करुन 15 गरजू कातकरी कुटुंबांची घरकुलाकरीता निवड केली.

या कुटुंबाकरीता कंपनीच्यावतीने हवामानपोषक घरकुलांसोबत रेन हार्वेस्टिंग व सोलर यंत्रणा अशा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानयुक्त पक्क्या घरांची निर्मिती केली आहे. घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल कातकरी समाजातील कुटुंबात समाधानाची भावना दिसून आली. यावेळी नाविन्यपूर्ण कामाबद्दल हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडियाचे कंपनीच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला.

[ad_2]