एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडी भागात ( Pune ) घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. गुलटेकडी भागात दोन दिवसांपूर्वी कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती.
किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार
आतिष सतीश अडागळे (वय 29 , रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाकीर मेहबूब शेख (वय 43 , रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली. याबाबत अडागळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडागळे आणि शेख एकाच भागात राहायला आहेत. आतिष हे गुरुवारी रात्री बहीणसोबत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी शेख तेथे आला. ‘तू वस्तीतील मोठा नेता झाला का ?’, अशी विचारणा करून त्याने अडागळेला शिवीगाळ केली. शेखने त्याच्याकडील कात्रीने डोक्यावर वार केले. त्याला मारहाण करून शेख पसार झाला. पोलिसांनी शेखला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक जोग तपास करत ( Pune ) आहेत.