Pune: गुड टच बॅड टच च्या कार्यशाळेत 10 वर्षीय मुलीने ज्येष्ठ नागरिकाकाडून  होणाऱ्या  लैंगीक अत्याचाराला फोडली  वाचा   


एमपीसी न्यूज –  पुण्यातील खडकवासला (Pune)परिसरातील एका शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमाद्वारे विद्यार्थींनींना माहिती दिली जात होती, मुलींना सजग करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान एका दहा वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. 68  वर्षाच्या नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यामुळे खडकवासला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dehugaon : चित्तथरराक मनोरा रचत अभंग स्कूलच्या गोविंदांनी फोडली दहीहंडी

दिलीप नामदेव मते या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील १० वर्षाची पीडित मुलगी शुक्रवारी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी दिलीप मते याने तिला खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवून जवळच्या एका खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या घटनेबाबत पीडित मुलीने घरी कोणालाही सांगितले नाही. दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेल्यावर शाळेमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांनी प्रत्येक मुलीशी संवाद साधत होते. त्या दरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितल्यावर आरोपी दिलीप मते याच्या विरोधात हवेली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास हवेली पोलिस करत आहेत.