एमपीसी न्यूज : प्रणव सातभाईने साकारलेल्या डिजिटल (Pune) पोर्ट्रेटचे बालगंधर्व रंगमंदिर प्रदर्शन हॉल मध्ये 23-26 ऑगस्ट दरम्यान आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आले.
प्रणव हा एक उत्तम फोटोग्राफर असून त्याने लॉकडाऊनमध्ये एडीटींग कलेचा उपयोग करून डिजिटल पोर्ट्रेट साकारले. आणि आपल्या सोशल मिडीयावरून शेअर केले. हळूहळू ते सोशल मिडीयावर महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील तमाम जनतेपर्यंत पोहोचले. आणि नाशिकचा हा कलाकार डिजिटल पोर्ट्रेट आर्टीस्ट जागतिक स्तरावर नावरुपास आला.
प्रणवने गेल्या अनेक वर्षात 5000 हून अधिक डिजिटल पोर्ट्रेट बनवून ह्या क्षेत्रात वर्ल्ड रेकॉर्ड कमावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, तंत्रज्ञ ह्यांच्याशी जोडला गेला. प्रणवने त्यांचे डिजिटल पोर्ट्रेट बनवले आहे.
PCMC : स्वयंसेवी संस्थांच्या सहाकार्याने शहरात अभ्यासिका
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या आश्रमात त्यांचा जीवनप्रवास उलगडणारी त्यांची डिजिटल पोर्ट्रेट्स प्रणवने साकारली आहेत. यापूर्वी त्याने साकारलेल्या डिजिटल पोर्ट्रेटचे नाशिक – पुणे – ठाणे येथे प्रदर्शन भरवण्यात आले होते आणि त्यालाही सगळ्याच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांतर्फे प्रणवला त्याच्या आजवरच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे.
प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या पोर्ट्रेटची ऑर्डरही देऊ शकतात. या प्रदर्शनाला पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.