Pune : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीग; दिएगो ज्युनियर्सची स्निग्मय एफसीवर निसटती मात


एमपीसी न्यूज : पीडीएफए सुपर डिव्हिजन लीगमध्ये (Pune) दिएगो ज्युनियर्सनी चुरशीच्या लढतीत स्निग्मय एफसीवर 4-3 अशी मात केली. दिवसातील अन्य सामन्यात ओमकार नाळेच्या गोल हॅट्ट्रिकच्या जोरावर एआयवायएफए स्काय हॉक्स नेगेम ऑफ गोल (जीओजी) फुटबॉल कोचिंग सेंटरविरुद्ध 9-3 असा मोठा विजय नोंदविला.

बावधन येथील गंगा लीजेंड्स मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल लीगमध्ये दिएगो ज्युनियर्सनी स्निग्मय एफसीला चांगलेच झुंजवले. करण मडकेने (३७वा आणि ४०वा) तसेच अंश वाघमारे (६८वा), ग्लेन रेबेलो (७२वा) यांनी प्रत्येकी एक गोल करताना सांघिक विजयात मोलाचा वाटा उचलला. स्निग्मय एफसीसाठी अंकुश कुमार (44व्या) आणि प्रतीक पाटीलने (54व्या आणि 60व्या) सामन्यात रंगत आणली. मात्र, त्यांना पराभव रोखता आला नाही.

एआयवायएफए स्काय हॉक्सने गेम ऑफ गोल फुटबॉल कोचिंग सेंटर विरुद्ध 9-3 असा मोठा विजय मिळवला. ओंकार नाळेची (४७वा, ६१वा, ६६वा) गोल हॅट्ट्रिक त्यांच्या मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. ओंकारला सदीम मोहम्मद (१२वा आणि १३वा), हृतिक पाटील (५वा, हर्ष दर्डा) (२१वा), हर्ष राठोड (१२वा) , राज मोरेचे (80 व्या) चांगले सहकार्य लाभले. जीओजीकडून सुमित सिंग (67 वी, 90 वी + 2) आणि ईश्वर क्षीरसागर (62 वे) यांनाच गोल करता आले.

आणखी एका सामन्यात, चेतक एफसीने थंडरकॅट्झचा 1-0 असा पराभव केला. अर्जून चौधरीचा (53वा) एकमेव गोल निर्णायक ठरला.

Snigmay FC yellow v Diego Juniors white blue 1

Chinchwad : गुन्हे शाखेतील 25 अंमलदारांना अंतर्गत नियुक्ती

एकतर्फी लढतीत, उत्कर्ष क्रीडा मंचने (यूकेएम) आठवड्याच्या सुरुवातीला (Pune) खेळल्या गेलेल्या सामन्यात थंडरकॅट्झला 6-2 असे हरवले. त्यात वेदांग पिंगळे (1वा, 6वा), पराग देशपांडे (24वा), शुभम (31वा), स्वयं गोल (65वा); अथर्व चव्हाणची (78व्या) सर्वोत्तम कामगिरी ठरली. थंडरकॅट्झसाठी पृथ्वीराज (३७वा) आणि यश साळुंकेने(५१वा) गोल केले.

तत्पूर्वी, इंद्रायणी एससीने संघवी एफसीचा 5-0 असा पराभव केला. विजयी इंद्रायणी एससी संघासाठी आयुष दीपक (३९), सूरज भैरट (४९वा), अजय राठोड (६५वा), शिवकुमार शेट्टी (८५वा) आणि शुभम गायकवाड (८७वा) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल:

दिएगो ज्युनियर्स एफसी: 4 (करण मडके 37वा, 40वा; अंश वाघमारे 68वा; ग्लेन रेबेलो 72वा) विजयी वि. स्निग्मय एफसी: 3 (अंकुश कुमार 44वा; प्रतीक पाटील 54वा, 60वा).

एआयवायएफए स्काय हॉक्स: 9 (हृतिक पाटील 5वे; सदीम मोहम्मद 12वे, 13वे; हर्ष दर्डा 21वे; हर्ष राठोड 12वे; ओंकार नाळे 47वे, 61वे, 66वे; राज मोरे 80वे) विजयी वि. गेम ऑफ गोल फुटबॉल कोचिंग सेंटर 3 (सुमित सिंग 67वे, 90+2; ईश्वर क्षीरसागर 62वा)

चेतक एफसी: 1 (अर्जुन चौधरी 53वा) विजयी वि. थंडरकॅट्झ: 0 (Pune)

उत्कर्ष क्रीडा मंच (यूकेएम): 6 (वेदांग पिंगळे 1ला, 6वा; पराग देशपांडे 24वा; शुभम 31वा; स्वयं गोल 65वा; अथर्व चव्हाण 78वा) विजयी वि. थंडरकॅट्झ: 2 (पृथ्वीराज जगदाळे 37वे; यश साळुंके 51वे);

इंद्रायणी एससी:5 (आयुष दीपक 39वा; सूरज भैरट 49वा; अजय राठोड 65वा; शिवकुमार शेट्टी 85वा; शुभम गायकवाड 87वा) विजयी वि. संघवी एफसी: 0.