Pune : पुणे ग्रामीणचे नवे अधीक्षक संदीप सिंह गिल तर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या


एमपीसी न्यूज : पुणे पोलिस (Pune) दलातील उपायुक्त संदीप सिंह गिल यांची पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.  महाराष्ट्र शासनाचे गृहविभागाने हे आदेश दिले आहेत. 

या सोबतच पोलीस उपायुक्त (Pune) बृहन्मुंबई या पदावर कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते यांची पोलीस उपायुक्त पुणे शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. राज तिलक रोशन यांची पोलीस उपायुक्त परिमंडळ 9 बृहन्मुंबई या पदावरून सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई) या पदावर बदली करण्यात आली आहे तर पोलीस उपायुक्त नागपूर येथील निमित गोयल  यांची पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई या जागी बदली करण्यात आली आहे.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo