Pune: पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात;एकाचा मृत्यू 8 गंभीर जखमी


एमपीसी न्यूज- पुण्यातील खडकी भागात भीषण अपघात (Pune)झाल्याची माहिती समोर आली आहे.आज सकाळी 9 वाजता हा अपघात घडला आहे. बस वरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून घडला अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

 

Untitled design 2024 08 25T133527.581

खडकी येथे आज सकाळी एसटी बसने  चार चाकीला धडक दिली असून या अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.या  अपघातात कारचं आणि बसचं मोठं नुकसान झालं आहे. बसवरील नियंत्रण सुटल्याने बस चालकाकडून हा भीषण अपघात झाला आहे.