Pune : पेट्रोलियम, रेल्वे बोर्ड संघ अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने

[ad_1]

हॉकी: उपांत्य फेरीत सर्व्हिसेस बोर्ड व एफसीआयवर पिछाडीवरून विजय

एमपीसी न्यूज -गतविजेते पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी) आणि गतवर्षीचे ( Pune ) उपविजेते रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी) संघांनी हॉकी महाराष्ट्र आयोजित चौथ्या हॉकी इंडिया पुरुष आंतर-विभाग राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सलग दुसर्‍या वर्षी दोन्ही संघ जेतेपदासाठी झुंजतील.

चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शनिवारी दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर पिछाडीवरून विजय मिळवले.

उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाने सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी) संघाचा 5-3 असा पराभव केला. त्यात गुरजिंदर सिंगचे दोन गोल मोलाचे ठरले. गतविजेत्यांनी दोन गोलच्या फरकाने विजय मिळवला तरी सुरुवातीला ते पिछाडीवर होते. 21व्या मिनिटाला अजिंक्य जाधवने मैदानी गोल करताना सर्व्हिसेसला आघाडीवर नेले. मात्र, सात मिनिटांच्या फरकाने गुरजिंदर सिंगने (28वे-पीएस) पेनल्टी स्ट्रोकद्वारे पेट्रोलियम बोर्डाला बरोबरी साधून दिली. त्यामुळे मध्यंतराला 1-1 अशी बरोबरी ( Pune ) होती.

उत्तरार्धात 6 गोलांची भर पडली. त्यात पेट्रोलियम बोर्डाने 4 गोल करताना आघाडी घेतली. त्यात युसुफ अफान (49वे), तलविंदर सिंग (50वे-पीसी), गुरजिंदर सिंग (55वे-पीसी) आणि अरमान कुरेशी (57वे) यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. सर्व्हिसेसकडून पवन राजभर (53वे) आणि सुशील धनवरने (58वे-पीएस) गोल करताना फरक कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे ( Pune ) पडले.

दिवसातील दुसर्‍या सामन्यात, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड  संघाने  फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एफसीआय) 2-1 असे रोखले. सामन्यातील तिन्ही गोल मैदानी होते. युवराज वाल्मिकी (46वे), अतुल दीप याचा (57वे) प्रत्येकी एक गोल आरएसपीबीच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. पराभवाचा सामना करावा लागला तरी अंकुश याच्यामुळे (12वे) एफसीआयने सुरुवातीला 1-0 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरापर्यंत आघाडी राखली तरी उत्तरार्धात शेवटच्या 14 मिनिटांमध्ये दोन गोल करताना रेल्वे स्पोर्ट्स बोर्डाने बाजी ( Pune ) पलटवली.

निकाल

उपांत्य फेरी पहिला सामना: पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (पीएसपीबी): 5(गुरजिंदर सिंग 28वे-पीएस, 55वे-पीसी, युसुफ अफान 49वे, तलविंदर सिंग 50वे-पीसी, अरमान कुरेशी 57वे) विजयी वि.  सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससी): 3(अजिंक्य जाधव 21वे, पवन राजभर 53वे, सुशील धनवर 58वे-पीएस): मध्यंतर: 1-1.

उपांत्य फेरी दुसरा सामना: रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (आरएसपीबी): 2(युवराज वाल्मिकी 46वे, अतुल दीप 57वे) विजयी वि. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय): 1(अंकुश 12वे). मध्यंतर: 0-1.



[ad_2]