एमपीसीन्यूज -बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात (Pune)आहे. महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी मूक आंदोलन करत निषेध दर्शवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत महाराष्ट्रात निषेध आंदोलन केले आहे . आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी पुण्यात मूक आंदोलन केले. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली आहे.
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शरद पवार यांनी पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बसून आंदोलन केले आहे. यावेळी सुप्रिया सुळे हि सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनावेळी शरद पवारांनी तोंडावर काळ्या रंगाचा मास्क आणि दंडावर काळी पट्टी बांधली होती. आंदोलनानंतर शरद पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना एक शपथ घ्यायला लावली.
Pune: कल्याण थाट के राग’ कार्यक्रमात झाले बुजुर्ग बंदिशकारांच्या बंदिशींचे सादरीकरण
“मी अशी शपथ घेतो की, मी स्त्रियांवर होणारा हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे ऑफिस कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास मी विरोध करून त्याबद्दलचा आवाज उठवेन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखेन आणि या पुण्य नगरीतच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित आणि भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन”, अशी शपथ शरद पवारांनी यावेळी वाचून दाखवली. त्यानंतर कार्यकर्त्यांनीही ही प्रतिज्ञा घेतली आहे.