एमपीसी न्यूज – पुणे शहरातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खुनाचा प्रकार उघडकीस (Pune ) आला आहे. गुलटेकडी परिसरातील डायसप्लॉट याठिकाणी मोक्कातील गुन्हेगाराने जामीनावर बाहेर आल्यानंतर एका तरुणाचा जुन्या वादातून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनील सरोदे (वय 20 , रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी रोहन कांबळे, साहिल कांबळे, शिवशरण धेंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.
Jaideep Apte : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक
पोलिसांच्या माहितीनुसार, साहिल कांबळे याच्यावर महाराष्ट्र संघटित गु्न्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. मोक्का कारवाई केल्यानंतर साहिल नुकताच जामीन मिळवून बाहेर आला आहे. सरोदे हा डायस प्लॉट येथे राहायला आहे. त्याचा भाऊ आणि आरोपींची भांडणे झाली होती. पोलीसांकडून साहिलविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार होती. कारवाईपूर्वी त्याने डायस प्लॉट परिसरात मध्यरात्री दहशत माजविली. आरोपी रोहन, साहिल हे साथीदारांसह सुनिल सरोदे याच्या भावाला मारण्यासाठी डायस प्लॉट परिसरात आले होते. सरोदेच्या भावाला ते मारत होते.
त्यावेळी सरोदेने भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला. सरोदेच्या मानेवर चाकूने वार करण्यात आला. मानेची नस तुटल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक (Pune ) केली.
https://support.google.com/youtube/answer/2802167?hl=en