Pune : व्यसनाधीनतेमुळे आयुष्य दिशाहीन होते – डॉ. शशिकांत दुधगावकर


एमपीसीन्यूज – व्यसनाधीनतेमुळे आयुष्यात कशाचाच ताळमेळ (Pune)लागत नाही. अंमली पदार्थ मेंदूवर सर्वात जास्त परिणाम करतात. यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धत प्रभावी होत असून याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होते. आयुष्य दिशाहीन होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी केले.

विद्यापीठात व्यसनमुक्तीवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देशातील सर्व शैक्षणिक संस्थांना ‘नशा मुक्त भारत अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यांतर्गत विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कौैशल्य विकास केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ. आर. एस. पंडित, डॉ. अंजली जगताप, डॉ. रवी आहुजा. डॉ. पुजा मोरे उपस्थित होत्या.

Hinjewadi : हॉटेल मध्ये हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा

व्यसनाधीनता हा मेंदूचा आजार आहे. अंमली पदार्थ्यांच्या सेवनामुळे व्यक्ती स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतो. आधी कूल आणि कॉन्फिडंट वाटण्यासाठी सुरू केलेले सेवन नंतर नाईलाज म्हणून करावे लागते. यामुळे आपल्याला दैनदिन जीवनात आनंद देणाऱ्या गोष्टींचा आनंद वाटत नाही. बधिरता येते आणि याचा परिणाम अप्रत्यक्षपणे कुटुंबावर, मित्र परिवारावरही होत असल्याचे डॉ. दुधगावकर यावेळी म्हणाले. व्यसनाधीनता म्हणजे काय?, यामागची कारणे, यामुळे शरिरावर-मेंदूवर होणारे परिणाम, प्रतिबंध करण्यासाठीचे उपाय यांसारख्या विविध पैलूंवर डॉ. दुधगावकर यांनी चर्चा केली.

यावेळी बी.वोक प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभही पार पडला. याप्रसंगी डॉ. आर.एस. पंडित यांनी या विद्यार्थ्यांना संबोधित केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती राऊत, शुभम बल्लाळ, चिराग भोसले आणि तन्मय गाडे यांनी परिश्रम घेतले.