एमपीसी न्यूज – साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरच्या सार्वजनिक गणेशोत्सवात 18 संतांच्या पादुका दर्शन सोहळा हा देखावा करण्यात ( Pune) आला आहे. तसेच श्री सद्गुरू शंकर महाराज मठाची प्रतिकृति उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे उद्घाटन उद्योजक पुनित बालन यांच्या हस्ते सोमवारी (दि. 9) सायंकाळी झाले.
यावेळी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर अध्यक्ष रवींद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, शिवानी माळवदकर, विजय गोरे, नितीन काळे, योगेश निंबाळकर, आनंद साळुंखे, धनंजय काळे आदी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, नामदेव, जनाबाई, नरहरी सोनार, सेना महाराज, निळोबाराय, रामदास, वेणाबाई, महावतार, स्वामी समर्थ, टेम्बे स्वामी, शंकर महाराज, गुळवणी महाराज ( Pune)यांच्या पादुकांच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. 9 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत दररोज एक संत याप्रमाणे श्री साईबाबा, जंगली महाराज, अक्कलकोट स्वामी समर्थ, माळी महाराज, गजानन महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ पादुका देखील दर्शनासाठी मांडण्यात येत आहेत. 1919 साली स्थापन झालेल्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीरला 105 वर्षांची परंपरा आहे.
TET : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी
पुनीत बालन म्हणाले, ‘चांगले सामाजिक कार्य गणेश मंडळाच्या मार्फत होऊ शकते याचे प्रत्यंतर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर गणेशोत्सव मंडळाने दाखवून दिले ( Pune)आहे. गणेश मंडळाचे कार्यकर्तेच समाजाच्या अडचणीत धावून येतात, हे आपण नेहमी पाहत असतो. आजच्या भेटीच्या निमित्ताने या मंडळाचा सामाजिक पुढाकाराची माहिती मिळाली. आम्ही नेहमी त्यात योगदान देऊ. रवींद्र माळवदकर हे गणेशोत्सवात नेहमी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावतात. ते प्रत्येक बैठकीत कार्यकर्ते, मंडळे आणि प्रशासनाला उपयुक्त सूचना करतात. त्यांचा अनुभव उत्सव पुढे नेण्यास उपयुक्त ठरेल.’
रवींद्र माळवदकर यांनी साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदीर आणि गणेशोत्सवाची माहिती दिली. तसेच वंचितांची दिवाळी, सर्वधर्मीय पुढाकाराची आषाढी वारी अशा अनेक सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. ‘समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून आम्ही उपक्रमांची रचना करतो आणि संघर्ष देखील करतो, असे त्यांनी सांगितले.
मंडळाचे कार्यकर्ते आणि देखावा साकारणाऱ्या कलाकारांचा सत्कार पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आला. शिवानी माळवदकर यांनी प्रास्ताविक केले. भाई कात्रे यांनी ( Pune) आभार मानले.